२०२४ लोकसभा-विधानसभेसाठी भाजपची महत्वाची घोषणा!

01 Mar 2023 18:48:27
BJP's important announcement for the Lok Sabha Assembly


मुंबई
: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने महाविजय २०२४ अभियान जाहीर केले असून या अभियानाची संयोजन समिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घोषित केली. या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणून आ. श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे . संयोजन समितीच्या सदस्यपदी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर , प्रदेश मुख्यालय प्रभारी रवीन्द्र अनासपुरे , प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक , प्रदेश सचिव श्वेता शालिनी , अरविंद निलंगेकर , प्रदेश मुख्यालय सहसचिव संजय फांजे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण विजय हे लक्ष्य ठेवून या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार हे या समितीचे विशेष निमंत्रीत आहेत. 

Powered By Sangraha 9.0