जगात भारी सेलीब्रेशन! न्यू-यॉर्क टाइम्स स्वेअरमध्ये साजरा झाला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस!

न्यू-यॉर्कमधील टाईम्स क्वेअर येथे जमून तरूणांनी साजरा केला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस

    09-Feb-2023
Total Views |
Eknath Shinde birthday celebration in New York


न्यूयॉर्क
: - महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. कारण जसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य समर्थक आहेत, तसेच परदेशात देखील तरूणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला लागली आहे. त्यामुळेच न्यू यॉर्क येथे कामानिमित्त असलेल्या काही तरूणांनी त्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे केक कापून साजरा केला.


Eknath Shinde birthday celebration in New York


भारतीय वंशाच्या पण न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या काही तरूणांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस तिथे साजरा केला. ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांचे हे मित्र असून त्यांच्याकडूनच कायम ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ऐकत असतात. त्यांच्या कामाची पद्धत आणि संवेदनशील वृत्ती आणि कार्यतत्परता याची भुरळ पडल्यानेच यंदा या मित्रांनी मिळून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. अभिनव जैन, राजीव पंड्या, रूचिता जैन अशी या तरूणांची नावे आहेत.


Eknath Shinde birthday celebration in New York


मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अत्यंत कमी वेळात धडाकेबाज निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी अमराठी माणसांच्या हृदयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस न्यू यॉर्क येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता, या तरूणांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स तयार करून ते टाईम्स क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवले आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी भेट देण्यासाठी त्यांचा वाढदिवस अशाप्रकारे साजरा करण्याचा निर्णय या तरूणांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका सातासमुद्रापार विस्तारला असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.