अजितदादा विरुद्ध सत्यजित तांबे! शपथविधीवेळीही दिसला संघर्ष

08 Feb 2023 15:37:28
Slogans at the swearing in of the newly elected members of the Legislative Council



मुंबई
:- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्यांचा दि. ८ फेब्रुवारी रोजी शपथविधी झाला. त्यावेळी सत्यजित तांबे शपथविधी घेण्यासाठी जात असताना तांबेच्या समर्थकांनी 'एकच वादा...सत्यजीत दादा' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनीही मग 'एकच वादा... अजित दादा' अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीने शपथविधी सोहळ्याचं स्थळ दुमदुमून गेलं. याबाबतचा व्हिडिओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दि.८ फेब्रुवारी रोजी सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची भेट घेतली. तेव्हा थोर स्वतंत्रसेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी लिहिलेले 'अमृत मंथन' व 'अमृत गाथा' हे ग्रंथ सत्यजित तांबे यांना केसरकरांनी भेट म्हणून दिले.

Powered By Sangraha 9.0