आदित्य ठाकरेंची सभा सुरू होती... आणि भिरकावला दगड!

    07-Feb-2023
Total Views |
aurangabad/aaditya-thackeray-aurangabad-speech-controversy

संभाजीनगर
: आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगरमधल्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दि. ७ जानेवारी रोजी रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती. पंरतू आदित्य ठाकरे यांची सभा आणि मिरवणूक एकाच वेळी एकाच ठिकाणी असल्याने सभास्थळी स्टेजवर एका अज्ञात व्यक्तिने दगड फेकला. जेथे आदित्य ठाकरेंची सभा सुरू होती ,तेथील स्टेज मागून मिरवणूक जात होती, तेव्हा डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.
 
या प्रकरामुळे आदित्य ठाकरे यांनी आपले भाषण उरकलं. तसेच या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रियास देत म्हणाले की, 'एकमेकांना समजून घ्यावं लागतं. काही कारणास्तव डीजे बंद झाला असेल, मी त्यांची माफी मागितली. शिवशक्ती भीमशक्ती आज एक आहे, आम्ही संविधानासाठी लढत आहोत. काही अडचण झाली असेल तर माफी मागतो. डीजे बंद झाला असेल ५-१० मिनीटांसाठी, मी माईकवरूनही डीजे चालू द्या, म्हणून सांगितलं,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सभा संपल्यानंतर गाडीत बसून जातानाही मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर ठोसे मारले. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना गावाच्या बाहेर नेण्यात आलं. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर प्लास्टिकचे दोन पाईप फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.