धक्कादायक! तुर्कस्तानातील भूकंपाचे छायाचित्र

06 Feb 2023 17:19:38

नवी दिल्ली
: तुर्कीत सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात दि.६ फेब्रुवारी रोजी पहाटे झालेल्या भुकंपाने मोठा हाहाकार उडाला आहे. हा भूकंप ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपाचा हादरा इतका जबरदस्त होता की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, एक शॉपिंग मॉल भुईसपाट झाल असल्याने मृतांचा आकडा ६००हून अधिक असल्याचे समजते आहे.



turkey-earthquake-photos

(तुर्कस्तानमधला भूकंप किती भीषण होता, याचा अंदाज या चित्रावरून लावता येतो. )


turkey-earthquake-photos

(सीरियाच्या इदलिब प्रांतातील दाना शहरातील ढिगाऱ्यातून बचाव कर्मचारी एका मुलाला घेऊन जात आहेत. हा भाग बंडखोरांच्या ताब्यात आहे.)


turkey-earthquake-photos

(सीरियाच्या इदलिब प्रांतातील बाब अल-हवा रुग्णालयात एक माणूस आणि एक मूल उपचारासाठी थांबले आहेत.)


turkey-earthquake-photos

(सीरियातील आफरीन शहरातील रुग्णालयात बॉडी बॅग जमिनीवर पडल्या होत्या. येथील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.)


turkey-earthquake-photos

(या भूकंपात तुर्कीतील मालत्या येथील येनी मशीदही उद्ध्वस्त झाली आहे. ही मशीद 1663 मध्ये पूर्ण झाली आणि 1665 मध्ये लोकांसाठी खुली करण्यात आली.)

 
turkey-earthquake-photos

(सीरियातील एजाज येथे भूकंपामुळे इमारतीचा ढिगारा खाली पडल्याने एका कारचे नुकसान झाले आहे. बहुतांश वाहनांची हीच स्थिती आहे.)



Powered By Sangraha 9.0