नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात, वर्ष २००९ ते २०१९ दरम्यान सलग निवडून येणाऱ्या या ७१ खासदारांची संपत्ती तब्बल २८६ टक्क्यांनी वाढली असल्याचे सांगितले. यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांचे खासदार असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या संपत्तीमध्ये १७३ टक्के वाढ झाली आहे. निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र सादर करत असताना सुप्रिया सुळेंच्या संपत्तीवेळी वांग्याच्या शेतीचा उल्लेख केल्याचे वारंवार दिसुन येतो.
सुप्रिया सुळे आणि वांग्याच्या शेतीचं नेमकं कनेक्शन काय?
2009 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल करताना आपल्याला शेतीतून 52 कोटी रूपयांचे उत्पादन मिळाल्याचे नमूद केले होते. 2014 सालीच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताईंनी हेच उत्पादन 113 कोटी रूपये दाखवले होते. मात्र, आपल्या मालमत्तेत किंवा संपत्तीत वाढ झाली नसल्याचे सांगत आपल्या मालमत्तेची किंमत वाढल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
शेती व कृषी उत्पन्नावर इनकम टॅक्स लागत नसल्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी मुंबई व पुणे शहरातील तब्बल 404 जणांनी आपल्याला शेतीतून 1 कोटींहून अधिक रूपयांचे उत्पन्न मिळाल्याचे दाखवले. यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वांग्याच्या शेतीतून 10 एकर शेती असूनही त्यांनी यामध्ये तब्बल 113 कोटी रुपये कमावले असल्याचे दाखवले. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरीसुद्धा कर्जबाजारी होवून आत्महत्या करत असताना, सर्वांनी सुप्रियाताईंकडून कमीत कमी जागेत भरघोस नफ्याची शेती कशी करावी हे तंत्र शिकलेच पाहिजे.
सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत नेमकी किती वाढ झाली?
२०१९ मध्ये संपत्ती १ अब्ज ४० कोटी ८८ लाख ८८ हजार ७०४ रुपये असून २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ८९ कोटींची वाढ झाली आहे. त्यांचेकडे फक्त 10 एकर शेती असूनही त्यांनी यामध्ये तब्बल 113 कोटी रुपये कमावले होते. याच शेतीमधील उत्पादन 2009 च्या निवडणुकीमध्ये दाखवले होते.
खासदारांची नावे आणि संपत्ती :
यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांचे खासदार असून या ७१ खासदारांमध्ये भाजपचे 43, त्याखालोखाल काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययूडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचे प्रत्येकी एका खासदाराचा यामध्ये समावेश आहे. तर ज्या खासदारांची संपत्ती सर्वाधिक वाढली आहे त्यामध्ये भाजपचे सहा खासदार असून राष्ट्रवादीचा एक, शिरोमणी अकाली दलाचा एक बीजेडीचा एक आणि एआययूडीएफच्या एका खासदाराचा समावेश आहे.
- पहिल्या क्रमांकावर पंजाबमधील शिरोमनी अकाली दलाच्या (SAD) भटींडा मतदारसंघाच्या खासदार हरसिमरत कौर बादल असून त्यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक २६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे असून त्यांच्या सपत्तीमध्ये १७३ टक्के वाढ झाली आहे.
- तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे ओडीसा राज्यातील पुरी मतदार संघाचे खासदार पिनाकी मिश्रा यांचा क्रमांक लागत असून त्यांच्या संपत्तीमध्ये २९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- चौथ्या क्रमांकावर भाजपचे बंगळुरु मध्य (कर्नाटक) चे खासदार पी.सी. मोहन हे आहेत. त्यांची संपत्ती ७५ कोटी ५५ लाख २९ हजार ३०६ रुपये इतकी असून २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ७० कोटींची वाढ झाली आहे.
- पाचव्या क्रमांकावर भाजपचे शिमोगा (कर्नाटक) चे खासदार बी. वाय. राघवेंद्र हे असून २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ६७ कोटी ४० लाख ९३ हजार ८५१ रुपये इतकी असून २००९ ते २०१९ या कालावधीत त्यांच्या संपत्तीमध्ये ६० कोटींची वाढ झाली आहे.
- सहाव्या क्रमांकावर भाजपचे पिलीभीत (उ. प्रदेश) चे खासदार वरुण गांधी यांचा क्रमांक असून त्यांची २०१९ मध्ये ६० कोटी ३२ लाख ५३९ रुपये इतकी संपत्ती आहे. २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ५५ कोटींची वाढ झाली आहे.
- सातव्या क्रमांकावर भाजपचे विजापूरचे खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनगी हे असून सन २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ५० कोटी ४१ लाख २२ हजार ९८५ रुपये इतकी होती. त्यांच्या संपत्तीमध्ये २००९ ते २०१९ दरम्यान ४९ कोटींची वाढ झाली आहे.
- आठव्या क्रमांकावर ऑल इंडिया युनाईटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) धुर्बी (आसाम)चे खासदार बद्रुद्दीन अजमल हे असून त्यांची २०१९ मध्ये ७८ कोटी ८० लाख ६४ हजार ४४ रुपये इतकी संपत्ती होती. २००९ ते २०१९ दरम्यान ते त्यांच्या संपत्तीमध्ये ४८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
- नवव्या क्रमांकावर भाजपचे हावेरी (कर्नाटक) चे खासदार उदासी एस.सी. यांचा क्रमांक असून त्यांची २०१९ मध्ये ७१ कोटी ८४ लाख ९९ हजार १९५ रुपये इतकी संपत्ती होती. २००९ ते २०१९ या काळात त्यांच्या संपत्तीमध्ये ३९ कोटींची ते वाढ झाली आहे.
- दहाव्या क्रमांकावर देखील भाजपच्या सुलतानपुर (उ. प्रदेश)च्या खासदार मनेका गांधी असून त्यांची २०१९ मध्ये ५५ कोटी ६९ लाख २६ हजार ४५१ रुपये संपत्ती होती. २००९ ते २०१९ दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये ३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.