मुंबई : जम्मू आणि काश्मीर तेथील निसर्ग सौंदर्यामुळे देशातीलच नव्हेतर परदेशातीलही पर्यटकांना आकर्षित करत असतो. हिवाळ्याच्या थंडीत इकडे नेहमीच पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमधील 'ग्लास इग्लू' रेस्टॉरंट म्हणजेच काचेचा इग्लू सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. काश्मीरमधील गुलमर्गच्या जगप्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन आकर्षण तयार करण्यात आलं आहे. भारतातील पहिलं ग्लास इग्लू रेस्टॉरंट गुलमर्ग तयार करण्यात आलं आहे. हे अनोखं रेस्टारंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. यामुळे काचेच्या इग्लूमध्ये बसून बर्फवृष्टीचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा कल आहे. गुलमर्गमध्ये काचेचा इग्लू बांधण्यात आले आहेत. इग्लू ओपन रेस्टॉरंटचा एक भाग आहे. या काचेच्या इग्लूमध्ये बसून तुम्ही काचेच्या भिंतीपलिकडून येथील निसर्ग सौंदर्याचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.
बर्फाच्छादित परिसर आणि पर्वतरांगांवरील बर्फाची चादर या निसर्ग सौंदर्याचा आनंद तुम्हाला येथे मिळेल. निसर्ग सौंदर्याचा आनंदे घेत तुम्ही येथे आरामदायी प्रकारे चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतात. या अनोख्या ग्लास इग्लू रेस्टॉरंटचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येत दाखल होत आहेत. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या गुलमर्गमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.