पी. चिदंबरम यांच्या पत्नीवर ‘ईडी’ची कारवाई

04 Feb 2023 16:30:32
saradha-money-laundering-case-ed-attaches-nalini-chidambaram

नवी दिल्ली
: शारदा मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम, ‘सीपीएम’चे माजी आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि इतर लाभार्थ्यांची मालमत्ता जप्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने एका निवेदनात म्हटले आहे की, “मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंध कायद्या’अंतर्गत 3.30 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि तीन कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरण 2013 पर्यंत पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये शारदा समूहाने केलेल्या कथित चिटफंड घोटाळ्याशी संबंधित आहे.”

‘ईडी’ने सांगितले की, “या समूह कंपनीने उभारलेली एकूण रक्कम सुमारे 2 हजार, 459 कोटी रुपये आहे. ज्यापैकी सुमारे 1 हजार, 983 कोटी रुपये अजूनही ठेवीदारांकडे आहेत.” या प्रकरणी ‘ईडी’ने आतापर्यंत सुमारे 600 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Powered By Sangraha 9.0