श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट, पीएफआय कट्टरतावाद्यासह तीनजण ताब्यात

04 Feb 2023 16:54:38
Conspiracy to attack Shriram temple

नवी दिल्ली
: अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या माहितीवरून एनआयएच्या पथकाने बिहारमधील मोतिहारी येथून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या मुस्लिम कट्टरतावादी संघटनेच्या कट्टरतावाद्याचाही समावेश आहे.

गेल्या महिन्यात ३१ जानेवारी रोजी नेपाळच्या जनकपूर धाममधील गंडकी नदीतील शाळिग्राम शिला पूर्व चंपारणमार्गे अयोध्येत नेण्यात आली. पूर्व चंपारणमधील चकियामार्गे शालिग्राम जात असताना 'अयोध्येत बाबरी मशीद नाही, तर श्रीराम मंदिर होणार नाही', असे सांगूत श्रीराम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. तसा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

त्यानंतर एनआयएच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने मोतिहारीमध्ये छापेमारी केली आहे. त्यामध्ये एनआयएने कट्टरतावाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. बिहारचे अतिरिक्त पोलिस महासंचालक जितेंद्र सिंह गंगवार यांनी एनआयएने तीन जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पीएफआयचा कट्टरतावादी रियाझ मारूफचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पाटणा येथील फुलवारी शरीफ येथे पीएफआय प्रशिक्षण केंद्र चालवल्याप्रकरणी रियाझ मारूफचे नाव समोर आले होते.

Powered By Sangraha 9.0