मुलीचा हात पकडून I LOVE YOU म्हणणे लैंगिक अत्याचार नव्हे : हायकोर्ट

28 Feb 2023 17:33:45
मुंबई : मुलीचा हात धरुन प्रेम व्यक्त करण म्हणजे विनयभंग होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. याप्रकरणी न्यायमुर्ती भारती डांगरे यांनी रिक्षाचालकाला अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
 
 
holding hands in love is not molestation
 
काय आहे प्रकरण ?
 
धनराज बाबूसिंह राठोड असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, १नोव्हें. २०२२ रोजी १७ वर्षाच्या पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपीने आपल्या मुलीचा हात पकडुन तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हणटले आहे.
 
पीडित तरुणी आणि आरोपी हे एकाच परिसरातील रहिवासी असुन ते एकमेकांना ओळखतात. आरोपी रिक्षाचालक आहे. पीडित तरुणीने शाळेत जाण्यासाठी अनेकदा आरोपीच्या रिक्षातून प्रवास केला आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला थांबवून तिला रिक्षात बसवुन घरी सोडले, मात्र, पीडितीने नकार दिला. तेव्हा आरोपीने तिचा हात पकडुन प्रेम व्यक्त केले. त्यावेळी पीडितीने तेथुन पळ काढला. आणि घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी तक्रार दाखल केली होती.
 
वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर न्यायमूर्ती डांगरे म्हणाले की, "आरोपींवर लावण्यात आलेले विनयभंगाचे आरोप निराधार आहेत. रिक्षाचालकाला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. आरोपीचा अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा कोणताही लैंगिक हेतू नव्हता." असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती करणार नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात आरोपीला बजावले आहे. तसे केल्यास अटकेतून दिलासा देणारा आदेश मागे घेतला जाईल, असा इशाराही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपींना दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0