वैभव नाईकही शिंदे गटाच्या वाटेवर ?

28 Feb 2023 11:22:32
मुंबई : सिंधुदुर्गातील कुडाळ मालवणचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पेव फुटले आहे.
 
Vaibhav Naik
 
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या काही वेळ विधानसभेत चर्चा झाली. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी नाईक हे सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर उद्योग मंत्र्यांच्या शेजारी येऊन बसल्याने आता ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या सेनेत सहभागी होणार का या चर्चांना सुरुवात झाली आहे.
 
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्षात ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन पडले होते. त्यानंतर न्यायालय आणि निवडणूक आयोगात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. नुकताच निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कुणाची हा निर्णय दिल्यानंतर आता ठाकरे गटातील नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0