गेट वे ऑफ इंडियावर आजपासून ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’

28 Feb 2023 15:36:47
At Gateway of India, light and sound show to be inaugurated on February 28


मुंबई
: राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रिटिश सैन्य दलाच्या भारतातील माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खा. अरविंद सावंत, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ‘इंडियन ऑईल’चे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, ‘इंडियन ऑईल’चे निदेशक (विपणन) व्ही. सतीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहील.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनव असा उपक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.


‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’बद्दल...
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होत असणार्‍या कार्यक्रमाचा भाग
  • सुरुवातीला आठवड्यातून दोन वेळेस म्हणजे शनिवारी आणि रविवारी
  • ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘प्रगतीशील भारत’ संकल्पनेवर आधारित
  • ‘स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान’ यावरही या शोच्या माध्यमातून प्रकाश


Powered By Sangraha 9.0