शिकागोच्या मराठी मंडळात रामदास फुटाणेच्या कविता

27 Feb 2023 17:32:21
marathi mandal  
 
मुंबई : शिकागो शहरात कायमस्वरूपी व तात्पुरता स्थायिक असलेल्या मराठी भाषिकांचे मराठी मंडळ आहे. या मंडळाद्वारे अनेक कार्यक्रम नियमितपणे राबवले जातात. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास कार्यक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कलाकार व लेखक डॉ. रामदास फुटाणे उपस्थित आहेत.
 
या कार्यक्रमातून अनेक स्थानिक तसेच नवोदित साहित्यिकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. शिकागो येथील वेळेनुसार हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता सुरु होईल तर भाटिया वेळेनुसार हाच कार्यक्रम २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता झूम च्या माध्यमातून पार पडेल. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद अथनीकर, माधव गोगावले, समीर कुलकर्णी, श्रद्धा भट, अश्विनी कुंटे व मिलिंद साली यांनी केले आहे. कार्यक्रमाची माहिती महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यक्ष उल्का नगरकर यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0