व्हॉट्सअॅपचं खास फिचर, आता मेसेजही एडीट करता येणार

25 Feb 2023 12:30:51
मुंबई : सध्या धावपळीच्या या जगात माणुस एवढा व्यस्त झाला आहे की, सोशल मिडिया साईट्स वापरताना आपल्याकडुन अनेक चुका होतात. काही वेळेस तर, व्हॉट्सअॅप वापरताना अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपण मेसेज पाठवत असताना त्यात टायपिंग एरर होतात. यामुळे अनेकदा चुकीचा मेसेजही समोरच्या व्यक्तीला जातो. तो जाऊ नये म्हणून बरेच लोक तो मेसेज डिलीट करतात.
 
WhatsApp edit feature 
 
जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर या समस्येचा सामना करावा लागला असेल तर लवकरच व्हॉट्सअॅप त्यावर उपाय आणणार आहे. व्हॉट्सअॅप एक खास फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप एखादा मेसेज चुकीच्या पद्धतीने सेंड झालं असेल, तर तुम्हाला तो डिलीट न करता एडिट करायचं ऑप्शन मिळणार आहे. हा फीचर युजर्ससाठी फारच उपयोगी ठरेल.
 
व्हॉट्सअॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाइट Wabetainfo नुसार, WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे iOS युजर्सला मेसेज एडिट करण्याचा पर्याय देईल. वेबसाइटने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकता की, एखादा मेसेज एडिट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला WhatsApp कडून अलर्ट मेसेज पाठवला जात आहे. नवीन फीचर अंतर्गत तुम्ही फक्त 15 मिनिटांसाठी मेसेज एडिट करू शकाल. म्हणजेच तुम्ही मेसेज पाठवल्यापासून पुढील 15 मिनिटेच एडिट करू शकता.
 
 
WhatsApp edit feature
 
असं असलं तरी नवीन फीचर अंतर्गत तुम्ही फक्त मेसेज एडिट करू शकाल मीडिया कॅप्शन नाही. म्हणजेच जर तुम्ही व्हिडीओ किंवा फोटोसह काहीतरी टाइप करून पाठवले असेल आणि ते चुकीचे असेल, तर तुम्ही ते पुन्हा यादीत करू शकणार नाही. सध्या हे फीचर काही iOS युजर्ससाठी डेव्हलप केले जात आहे, जे नंतर बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च केले जाईल. नंतर येत्या काळात ते सर्वांसाठी लॉन्च केले जाईल. हे अँड्रॉइडसाठी कधी रिलीज होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0