अन् पाच जणांना मिळाली संजीवणी

25 Feb 2023 19:02:47
Dr. D. Y Patil Medical College

पिंपरी : उपचारदरम्यान मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आलेल्या १९ वर्षीय युवकाने पाच जणांना नवजीवन दिले. प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड, यकृत, दोन मूत्रपिंड, हे अवयव गरजू रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले.

फलटण परिसरात रस्त्यावर झालेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. त्याला उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी आठ दिवस त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण दुर्वेवाने रुग्णाने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, अवयव दानाच्या केलेल्या आवाहनाला त्याची आई आणि तिचा 22 वर्षीय मोठा भाऊ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

त्यात 52 वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. 39 वर्षीय महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपण केले आणि 53 वर्षीय पुरुषाला यकृत प्रत्यारोपण तर 35 वर्षीय पुरुषाला एक मूत्रपिंड आणि स्वादूपींड प्रत्यारोपित करण्यात आले या सर्व शस्त्रक्रिया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वीरित्या पूर्ण झाल्या तसेच दुसरे मूत्रपिंड सोलापूर येथील रुग्णालयात 47 वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित केले.
 
मेंदू मृत तरुणाच्या घरची परिस्थिती हलाखीची होती शेतीवर त्याचा उदर्निवाह होता. लहानपणीच वडीलाचे निधन झाले होते. त्यात घरातील छोटा भावाच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला अशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत अवयवदानाला संमती दिले.

सहभागी डॉक्टर्स -

हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण प्रक्रियेत डॉ संदीप अट्टावार, डॉ अनुराग गर्ग, डॉ एम. एस बारथवाल, डॉ सुशीलकुमार मलानी भूलतज्ञ् डॉ विपुल शर्मा, डॉ शाहबाझ हसनैन यकृत व स्वादुपिंड प्रत्यारोपण प्रक्रियेत रुग्णालयाच्या प्रत्यारोपण विभागाच्या प्रमुख व कार्यक्रम संचालिका डॉ वृषाली पाटील, डॉ मनोज डोंगरे भूलरोग तज्ज्ञ श्रीकांत कोटे व यकृत प्रत्यारोपण प्रक्रियेत डॉ बिपीन विभुते व त्यांची टीम तसेच डॉ शरण नरुटे, डॉ आदित्य दाते यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
रुग्णालयात अवयव दान व प्रत्यारोपणाची प्रक्रिया येथेच पूर्ण झाली. यासाठी आमचे कुशल व अनुभवी प्रत्यारोपण तज्ञ, सर्व सेवा सुविधा तसेच जलदरित्या कार्यरत असणारी वैद्यकीय यंत्रणा हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे अवयव प्रत्यारोपण यशस्वी झाले आहेत - डॉ. यशराज पाटील  (डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलचे विश्वस्त व खजिनदार)


Powered By Sangraha 9.0