खानिवडे : सकल हिंदू समाज वसई, विरार आणि नालासोपारातर्फे येत्या रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधात वसईत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘अब फिर एक बार हिंदुओकी हुंकार’ची घोषणा घेऊन रविवारी सकाळी ९.३० वाजता वसई पश्चिमेतील सन सिटी येथे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. वसईच्या श्रद्धा वालकरची झालेली निर्घृण हत्या, अवैद्य प्रार्थनास्थळे, भूमी जिहाद आदी विरोधात हा मोर्चा असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.