ठाण्यात पेट फेस्टिव्हल - श्वानांसाठी स्पर्धा व फॅशन शो

23 Feb 2023 18:51:27
sports-competitions-and-fashion-shows-for-dogs-2-days-pet-festival-in-thane


ठाणे
: सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरात ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेच्या माध्यमातून यंदाही ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. घोडबंदर रोडवरील खेवरा सर्कल येथील मैदानात २५ ते २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या फेस्टिव्हलचे उदघाटन शनिवारी दुपारी ४ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
 
दोन दिवस रंगणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये पाळीव प्राण्यांच्या विनामुल्य आरोग्य तपासणीबरोबरच श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा व फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, ट्विन वॉक, फॅशन वॉक असे आगळे-वेगळे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांबरोबरच ठाणेकरांना पाळीव पाण्यांच्या विविध दुर्मिळ प्रजाती पहाव्यास मिळणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी विविध खाद्यपर्थांचे व पेय स्टॉल लावण्यात येणार असल्याने नागरिकांना खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. घोडबंदर रोड येथील खेवरा सर्कल भागातील डिमार्टलगत असलेल्या गार्डन इस्टेटजवळील मैदानात २५ ते २६ फेब्रुवारी रोजी हा फेस्टिव्हल होणार असुन या फेस्टिव्हलमध्ये श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यातील विजेत्यांसाठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.अशी माहिती आयोजकानी दिली.
 
अधिक माहितीसाठी संपर्क - प्रमोद निंबाळकर 9769928585





Powered By Sangraha 9.0