शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचा जल्लोष

18 Feb 2023 15:32:06
shivsena-symbol-dhanushyaban-goes-to-eknath-shinde-celebrations-by-shinde-gat

ठाणे
: “अखेर हा सत्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, खर्‍या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे,” अशी मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने ’शिवसेना’ नाव आणि ’धनुष्यबाण‘ चिन्ह मिळाल्याबद्दल टेंभी नाक्यावरील आनंद मठात भगवा फडकवत जल्लोष साजरा केला. टेंभीनाक्यावर शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला. टेंभीनाका येथील जल्लोषात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के व अनेक नगरसेवक सहभागी झाले होते.

डोंबिवलीतही जल्लोष

केंद्रीय निवडणूक आयोगाने ’शिवसेना‘ हे नाव आणि ’धनुष्यबाण‘ चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेपश निर्णय समजताच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या यांनी शिवसेना शहर शाखेसमोर गर्दी करत जल्लोष साजरा केला. यावेळी दिपेश म्हात्रे, बंडू पाटील, प्रकाश माने, महेश पाटील, स्वाती मोहिते, राजेश मोरे, सारिका चव्हाण, वैभव राणे, स्वाती हिरवे आदी पदाधिकारी उपस्थितहोते.

Powered By Sangraha 9.0