दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वरात उसळला अलोट भक्तीचा सागर!

18 Feb 2023 19:33:51

Kunkeshwar 2023
 
देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या जत्रेची शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. सोमवार, दि. २० फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या या यात्रेची समुद्रस्नानानंतर सांगता होणार आहे. अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळते. यानिमित्त देवस्वाऱ्यांचे अलौकिक दृश्य पहाण्यासाठी दूरदूरहून भाविक येते.
 
 
 
शनिवारी श्री क्षेत्र कुणकेश्वर पर्यटकांच्या गर्दीनेही गजबजलेले होते. यात्रोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. भाविकांच्या उपस्थितीने गजबजणारा यात्रा परिसर, देवस्वाऱ्यांच्या आगमनावेळचे नेत्रदीपक दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी लाखो भाविक पुणे मुंबईहून देवगडात येतात.
 
Kunkeshwar 2023
 
महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकर भेटीला येतात, अशी भाविकांची आस्था आहे. यात्रेसाठी येणारे लाखो भाविक शिवलिंगाला बेलाचे पान, दुध आणि इतर नैवेद्य अर्पण करतात. गेल्या कित्येक वर्षापासून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू आहे. आता तर कार्यकर्ते सरकारकडून या परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. मंदिराची स्वतंत्र अशी धर्मशाळाही आहे.
 
 
 
आजूबाजूला माड-पोफळीच्या बागा आणि घनगर्द हिरव्या आमराईच्या वेढ्यात असलेले हे मंदिर भाविक भक्तांच्या मनाला प्रसन्नता प्राप्त करून देते. या मंदिरात दरवर्षी माघ महिन्यात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने येथे फार मोठी यात्रा भरते. गेली कित्येक दशके ही यात्रा सुरू आहे.
 
 
कुणकोबाची जत्रा जवळ ईली रेऽऽ...
 
या भागातील बोलीभाषा मालवणी..."काय वारो सुटलो हा कुणकोबाची जत्रा जवळ ईली रेऽऽ..." असे म्हणत ह्या जत्रेची मोठ्या आनंदाने सर्व भाविक वाट पाहत असतात. परस्पर सामंजस्य, एकता, एकजूट, प्रेम, आपलेपणा गेल्या कित्येक दिवसातला परस्पर भेटीतला दुरावा नाहीसा करणारी ही यात्रा नक्कीच विलक्षण आहे.
 
 
Kunkeshwar 2023
Powered By Sangraha 9.0