पाकिस्तानात पेट्रोलचा भडका

17 Feb 2023 15:06:56
increase price of petrol in pakistan

इस्लामाबाद
: कंगाल झालेल्या पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला असून इंधनाच्या किमतींचा भडका उडाल्याने देशभरात असंतोष वाढत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधनाचे दर तब्बल १२ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल २२.२० रुपयांनी वाढून २७२ रुपये प्रतिलीटर इतके महाग झाले आहे.‘हायस्पीड डिझेल’च्या किमतीत १७.२० रुपयांनी वाढ केल्याने त्याची किंमत २८० रुपये प्रतिलीटर झाली आहे.

Powered By Sangraha 9.0