सोने झाले स्वस्त

17 Feb 2023 15:00:52
gold-rate-today

मुंबई
: गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्याने ५८,८०० चा विक्रमी उच्चांक गाठला. पण, आता सोने खरेदी करणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने विक्रमी उच्चांकावरून तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. ‘या आठवड्यात सोन्यामध्ये घसरण दिसून आली. दोन आठवड्यांपूर्वी ५८,८०० रुपयांवर असणारे सोने ५६,१००च्या पातळीवर आले आहे, म्हणजेच त्याची किंमत २,७०० रुपयांनी खाली आली आहे. मुंबईत २४ कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा भाव ५६,७३० रुपये इतका आहे.


Powered By Sangraha 9.0