कोटक महिंद्रा बँकेच्या अँड कँम्पेनमधून तन्मय भटची हकलपट्टी!

    15-Feb-2023
Total Views |
tanmay-bhat-promoted-child-rape-talks-girls-boobs-callsed-parsi-girls-slut-fuck-kotak-mahindra

मुंबई
: हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या तन्मय भटची कोटक महिंद्रा बँकेच्या अँड कँम्पेनमधून हाकलपट्टी करण्यात आली आहे. ट्विटर वापरकर्त्यांनी तन्मय भटचे जुने ट्विट समोर आणले आणि अशा व्यक्तीला जाहिरातीचा चेहरा बनवल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेची खिल्ली उडवली. या ट्विटमध्ये तन्मय मुलींवरील बलात्कार आणि गणपतीच्या मूर्तीची खिल्ली उडवत होता. हे ट्विट १ वर्ष जुने आहेत. कॉमेडियनच्या जुन्या जोक्सवर आक्षेप घेत अनेकांनी ट्विटरवर कोटक बँकेला टॅग करत ही मोहीम मागे घेण्याची मागणी केली. बँकेने अखेर भट यांना जाहिरातीतून काढून टाकले आणि लोकांची माफी मागितली.

कॉमेडियन तन्मय भट वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. . काही वर्षांपूर्वी #MeToo चळवळीदरम्यान त्याच्या सहकाऱ्यानेही त्यांच्यावर आरोप केले होते. तन्मय भट, जो 'ऑल इंडिया बकचोद (AIB)' या गैरवर्तन करणार्‍यांच्या गटाचा देखील एक भाग आहे.त्याचवेळी तन्मयने लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचीही खिल्ली उडवली, त्यानंतरही त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

तन्मय भट यांने २३ मे २०१२ रोजी ट्विट केले होते त्यात त्यांने लिहले होते की, "मुलांना बलात्कार आवडत नाहीत हे तुम्हाला कसे कळते?" तर , “पारशी समाजाला २०१५ मध्ये आदिवासी दर्जा मिळणार असल्याचे नुकतेच ऐकले. मला वाटते की, पारशी मुलींनी वेश्यांसारखे वागण्याची आणि आणखी थोडीशी संभोग करण्याची वेळ आली आहे.” कल्पना करा, ही व्यक्ती अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी 'स्लट इट अप' आणि 'फक' सारखे शब्द वापरते, पण त्यावर कोणताही आक्रोश नाही. अशा आशयाचे ही वादग्रस्त ट्विट तन्मय भट पुर्वीपासून करत आलेला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून कोटक महिंद्रा बँकेच्या अँड कँम्पेनमधून तन्मय भटची हाकलपट्टी करण्यात आली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.