जाणून घ्या भारतीय संस्कृतीतील प्रेम साजरे करण्याचे 10 दिवस कोणते

14 Feb 2023 17:58:24
भारतीय संस्कृती कुटुंब वत्सल आहे. स्त्रीपुरुषांच्या परस्पर संबंधावर नात्यावर या कुटुंबातील स्निग्धता टिकून असते. भारतीय संस्कृतीतच स्त्री पुरुषाच्या नात्यांचे सण सर्वात जास्त आहेत. आता काळाच्या ओघात काही सणांना उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं, परंतु आपल्या आपल्या प्रायव्हसीत साजरे केले जाणारे असे १० सण आज व्हॅलेंटाईन डे च्यानिमित्ताने मी तुम्हाला सांगणारे. मग भाऊ बहीण, आई मुले याचे अजून बाजूला ठेऊ आणि फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातलं प्रेम वाढीस लागणारे असं कोणतं सण भारतीय संस्कृतीत आहेत?

valentine 
 
मिलनोत्सुक मनांना अंधाराचा आणि त्यातूनही वाट दाखवणाऱ्या चंद्राचा आधार असतो. चंद्राच्या पूर्ण बिंबाच्या दिवशी या प्रेमी युगुलांना आणि पती पत्नीच्या शृंगारिक नात्याला उधाण येतं. अशा तीन ऋतूतल्या ३ पौर्णिमा आपण साजऱ्या करतो. नारळी पौर्णिमेला गोड भात पतीला भरवून स्निग्धता देणारे नारळाचे पदार्थ बनवले जातात. कोजागिरी पौर्णमेला तर रात्रीच्या चुली आवरून बलवर्धक दूध चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेऊन चांदण्यात रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत पती पत्नी गप्पा मारत बसतात. अशा कुंद वातावरणात कित्येक दिवसांचा दोघांचाही कामाचा शीण निवून जातो. चंद्र चांगला डोक्यावर येईपर्यंत अंगणात गारठ्यात गोठून गरम आणि शक्ती देणारे दूध प्रश्न करूनच जोडपे शयनकक्षात जाते. वटपौर्णिमेला मात्र स्त्रीच प्रेमुच्चनक गाठत. हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून वृद्धीचे प्रतीक असलेल्या वडाच्या पारंब्यांना ती आपल्या प्रेमाच्या धाग्याने शपथेत बांधून ठेवते. त्यासाठी उपवास ठेवते.
 
तीन पाडव्यांपैकी गुढी पाडवा आणि दिवाळी पाडवा पत्नी पतीचे औक्षण करून कपाळावर रक्तवर्ण टिळक लावून आपले शक्तिप्रदर्शन करते. दिवाळीत सुगंधी तेल आणि उटणे पतीच्या सर्वांगाला चोळून काढत पाण्याने त्याला आंघोळ घालते. निकट सहवासाने प्रेम वाढतं ते अशाच सणांतून. आपल्या व्यस्त शेड्युलमधून दोघेही एकमेकांसाठी वेळ काढतात त याच सणांना.
वसंत पंचमी किंवा वसंतोत्सवात वसंत ऋतूतील निसर्ग हिरवी गाणे गात असतो. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावा असं कवीही म्हणून गेलेत. दुसरी पंचमी ती रंगपंचमी. खरेतर रंगपंचमी होळीनंतर ५ दिवसांनी येते. आपण धुळवड म्हणूया का? देवघरातल्या तबकातला गुलाल किंवा काही संस्कृतीत होळीतील राख एकमेकांना लावून प्रेम फुलवले जाते. एकमेकांची थट्टा मस्करी करत इतरही लोकांना या समारंभात हल्ली सामील करून घेतले जाते.
 
दीप अमावास्येला दिवे लावून मंद प्रकाशात चालून येणाऱ्या दिवाळ सणाची तयारी सुवासिनी करतात. हरितालिकेला तर समर्पणाचे पूर्ण निकष तोडून निर्जळी उपवास पतीसाठी या पतिव्रता करत असतात. पुत्रदा एकादशीला कृष्णासारखा बुद्धिमान आणि सुधृद मुलगा आपल्या पतीपासून मिळावा म्हणून स्त्रिया उपवास करतात. यासारखे असं अनेक सॅन अजूनही राहून गेले असतील. किती बोलावं किती लिहावं, या समृद्ध संस्कृतीबद्दल शोधावं तेवढं कमीच. बरं, या सर्व सणांना केल्या सणाऱ्या पूजा आणि उपवसांमागे शास्त्रीय करणे सुद्धा आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0