सिटाडेल फ्रँचायझीतील इंडियन ओरिजनल सिरीजमध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु

    01-Feb-2023
Total Views |
मुंबई : प्राइम व्हिडिओने आज घोषणा केली की, प्राइम व्हिडिओ आणि रूसो ब्रदर्स AGBOची ग्लोबल इवेंट सिरीज, सिटाडेल यूनिवर्सच्या भारतीय इंस्टॉलमेंटमध्ये वरूण धवनसह प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभु मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. राज आणि डीके (राज निदिमोरू आणि कृष्णा डीके) यांनी भारतात बनवलेल्या या अनटायटल्ड सिटाडेल सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

prime video 
 
तसेच, सीता आर. मेनन आणि राज आणि डीके यांनी या लोकल इंस्टॉलमेंट सिरीजचे सहलेखन केले आहे. स्ट्रिमिंग सर्व्हिसने दिलेल्या अपडेटनुसार असे समजते की, सध्या मुंबईमध्ये याच्या प्रोडक्शनचे काम सुरु आहे. यानंतर, युनिट उत्तर भारतात, सर्बिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर जाणार आहे. अशातच, ही अनटायटल्ड इंडियन ओरिजिनल सिटाडेल सिरीज जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होईल.
 
समांथा रुथ प्रभु म्हणाल्या, "जेव्हा प्राइम व्हिडिओ आणि राज आणि डीके यांनी या प्रोजेक्टसाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी त्वरित त्यांच्यासोबत काम करण्याच्या निर्णय घेतला. 'द फॅमिली मॅन'मध्ये मी या टीमसोबत काम केले आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी घरवापसीसारखे आहे. सिटाडेल युनिवर्स आणि जगभरातील प्रॉडक्शन्समधील परस्परसंबंधित कथानक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय इंस्टॉलमेंटच्या स्क्रिप्टने मला उत्साहित केले.
 
रुसो ब्रदर्सच्या संकल्पनेवर आधारित या उत्कृष्ट यूनिवर्सचा भाग बनण्याची मला संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. तसेच, या प्रोजेक्टद्वारे मला वरुणसोबत पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली याचाही मला आनंद आहे. ते एक अतिशय उत्साही व्यक्ती आहेत आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण नेहमी आनंदी ठेवतात."
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.