मुंबई :
वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल
भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी या
महिन्यात होणाऱ्या इतर साहित्य संमेलनांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. दैनिक मुंबई
तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ललित गद्य आणि वैचारिक वाङ्मयावर आपली मते
मांडली आहेत.
नरेंद्र चपळगावकर म्हणाले, "आज वैचारिक
वाङ्मय प्रसिद्ध कमी का होत आहे, याची कारणे शोधण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. एकच
गोष्ट येथे सांगता येईल, ती म्हणजे समाजाचे ऐक्य आणि समाजातली उदारता आणि
सहिष्णुता जेवढी अधिक असेल तेवढे जास्त वैचारिक साहित्य लिहिले जाईल."
साहित्याचा आणि अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या लेखकांचा
विचार करणारे नरेंद्र चपळगावकर साहित्यालाही न्याय देतील अशी आशा आहे. साहित्य
संमेलनासाठी आजच संभाजीनगरहून चपळगावकर वर्ध्याला आपली पत्नी आणि लेकीसोबत निघाले
आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची उत्सुकता मात्र लागून राहील.