मुंबई - पुणे मार्गावर धावणार तब्बल १०० शिवाई बसेस

01 Feb 2023 19:06:00
shivai-bus


मुंबई
: मुंबई - पुणे मार्गावर पुढील दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या १०० शिवाई बसेस धावणार असून मुंबई-पुणे मार्गावर सध्या धावत असलेल्या शिवनेरी बस या हळूहळू थांबवण्यात येणार आहेत. ‘शिवाई’ बसेस या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून, त्यांना एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे.

केंद्राच्या फेम २ अंतर्गत पुढील दोन महिन्यांमध्ये एसटी महामंडळात १५० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून ठाणे-पुणे, दादर-पुणे, नाशिक-पुणे, कोल्हापूर-स्वारगेट, औरंगाबाद-शिवाजीनगर, पुणे-बोरीवली या मार्गांवर देखील या शिवाई बसेस धावणार आहेत. ‘शिवाई’ बसच्या मुंबई-पुणे प्रवासाचे भाडे हे ३५० रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई-पुणे प्रवासासाठी शिवनेरी बसच्या तिकीटाचा खर्च हा साधारण ४५० ते ५०० रुपयांपर्यंत येतो. दरम्यान पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे तिकीटांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. परंतु नव्याने रुजू झालेली शिवाई ही इलेक्ट्रिक बस असून त्यामुळे या बसचे तिकीटदर कमी असणार असल्याचे म्हटले जात आहे.


Powered By Sangraha 9.0