विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प: सुधीर मुनगंटीवार

    01-Feb-2023
Total Views |
Sudhir Mungantiwar


मुंबई
: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
 
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, हम सब एक है या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे.

''विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित 'सप्तर्षी योजना' म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवीत आणि अंत्योदयाचं पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे.''

''नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो करोडो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. देशातील अत्यंत प्रामाणिक अशा नोकरदार मध्यमवर्गाचा देखील उचित विचार ह्या अर्थसंकल्पाने केला आहे.''

''एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना, आणि जग जेंव्हा मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, ह्या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकलंच आहे पण त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे.''
 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.