'फायटर' मधील 'ग्रूप कॅप्टन राकेश जय सिंगच्या भूमिकेतील अनिल कपूरचा खास लूक प्रदर्शित!

09 Dec 2023 14:15:54

fighter 
 
मुंबई : २०२३ हे वर्ष संपत आले. या वर्षभरात हिंदी चित्रपटांनी विविधांगी विषयांवर आधारित चित्रपट दिले. त्यातले काही प्रेक्षकांच्या पसंतीस आले तर काहींना फ्लॉप चित्रपटांच्या यादीत समाविष्ठ करण्यात आले. परंतु, देशावर आधारित चित्रपटाचे कथानक असणारे बरेचसे चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या यादीत नक्कीच पक्के झाले. असाच एक २०२४ या वर्षात येणारा ‘फायटर’ चित्रपट आहे. गेल्या अनेक काळापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
 
फायटर या चित्रपटात ह्रतिक रोशनच्या लूकची जितकी चर्चा झाली त्याहून अधिक चर्चा अनिल कपूर यांच्या लूकची होताना दिसत आहे. फायटर चित्रपटातील अनिल कपूर यांच्या भूमिकेची खास झलक प्रदर्शित केली असून यात ते ग्रूप कॅप्टन राकेश जय सिंगच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 

anil kapoor 
 
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि वायाकॉम १८ स्टुडियो आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होत असलेला 'फायटर' हा एक सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांसाठी ठरणार आहे. तसेच, फायटर या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेत्री दीपिका पडूकोण आणि अभिनेता ह्रतिक रोशन मोठ्या पडद्यावर एकत्रित काम करणार आहेत. दरम्यान, ‘फायटर’ २५ जानेवारी २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
Powered By Sangraha 9.0