मुंबई : नवाब मलिक आजारपणाचा खोटा आव आणुन कोर्टाची फसवणुक करत आहेत असा आरोप मोहीत भारतीय यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या 'एक्स' अकांउंटवर विडीओ पोस्ट केला आहे. येथुन सुरु झाला नवाब मियॉंचा फर्जीवाडा अस शिर्षक त्यांनी या विडीओला दिले आहे.
नवाब मलिक खोटे कागदपत्र देऊन किडणीच्या आजारावर उपचारांसाठी म्हणुन बेल वर बाहेर आले, परंतु ते हिवाळी अधिवेशनात आले होते. ते पुर्णपणे तंदुरुस्त आहेत हे आपण सर्वांनी पाहीलं आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांचा जामीन मागे घेवून त्यांना पुन्हा अटक करावी असही ते म्हणाले.
नवाब मलिकांबरोबरच त्यांनी अनिल देशमुखांवरही निशाणा साधला आहे. देशद्रोहाचा अरोप असलेले नवाब मलिक व १०० कोटींच्या वसुलीचे आरोप असलेले अनिल देशमुख अधिवेशना वेळी गळाभेट करत होते. असही ते यावेळी म्हणाले. त्यांनी कोर्टाची फसवणुक केली आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांचा जामीन मागे घेवून त्यांना पुन्हा अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलीक यांच्यावर देशद्रोहाचा अरोप आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. नवाब पलिक हे गुरुवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना महायुतीत सहभागी न करण्याची विनंती अजित पवारांना केली आहे.