नवी दिल्ली : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर 'हिप रिप्लेसमेंट' शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हैदराबादच्या यशोदा रुग्णालयात केसीआर यांना दाखल करण्यात आलं आहे.पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली. केसीआर यांच्या मुलीने ट्वीट करत ही माहिती दिली होती.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लिहिले की, “तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर जखमी झाल्याचे जाणून मला दु:ख झाले आहे. मी त्यांना चांगले आरोग्य आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” असं ते म्हणाले.