अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिकांचा पवारांना दणका!

07 Dec 2023 12:50:26


Malik & Sharad Pawar

नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शरद पवार गटाला दणका दिला आहे. सभागृहात नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. माजी मंत्री नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात होते. सध्या ते जामिनावर आहेत. दरम्यान, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तसेच ते आपल्याच सोबत आहे असा दोन्ही गटांकडून दावा करण्यात येत होता.
 
मात्र, नवाब मलिकांनी याबाबत कोणतीच भुमिका स्पष्ट केली होती. गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात त्यांनी हजेरी लावली. यावेळी नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.



 
Powered By Sangraha 9.0