मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने विमा क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथा क्रमांक पटकावला आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, एलआयसीकडे ५०३.७ अब्ज डॉलर्स रक्कमेचा रिजर्व उपलब्ध आहे. या यादीत पहिला क्रमांकावर जर्मन विमा कंपनी एलियांज ७५० अब्ज डॉलर्सच्या रिजर्वसह पहिल्या क्रमांकावर आहे.
त्यासोबतच चीनची लाइन इन्शुरन्स कंपनी ६१६.९ अब्ज डॉलर्सच्या रिजर्वसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील टॉप ५० विमा कंपन्यांच्या यादीत एलआयसी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, जागतिक जीवन विम्यात भारताचा वाटा फक्त १.९ टक्के आहे.
एलआयसीमध्ये सरकारची हिस्सेदारी ९६.५ टक्के इतकी आहे. तर ३.५ टक्के हिस्सेदारी सरकारने खाजगीकरणाच्या योजनेनुसार आयपीओद्वारे आपली हिस्सेदारी विकली होती. भारताच्या जीवन विमा क्षेत्रात एलआयसीची पूर्णपणे मक्तेदारी आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत भारताचा विमा बाजार लहान असताना सुद्धा एलआयसी चौथ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.