उद्धव ठाकरे किती रडारड करणार? ईव्हीएमवरून भाजपचा ठाकरेंना टोला!

05 Dec 2023 17:12:48
BJP on Uddhav Thackeray

मुंबई
: उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असा टोला आता महाराष्ट्र भाजपाने एक्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर लगावला आहे.

तसेच राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे.कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की ईव्हीएमवर शंकाम घ्याची,उद्धव ठाकरे किती रडारड करणार? असा सवाल ही भाजपाने उपस्थित केला आहे.



Powered By Sangraha 9.0