जातीपातीत द्वेष भडकविण्याचा विरोधकांचा प्रयत्न! मोदींनी दिलं उत्तर! "माझ्यासाठी 'हे' चार वर्गच महत्वाचे!"

    04-Dec-2023
Total Views |

modi
 
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपचा मोठा विजय हा प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, तेलंगणातही भाजपला पाठिंबा सतत वाढत आहे. या निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण देशात चारच जाती आहेत- महिला शक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंब. या ४ जातींना सक्षम करूनच देश मजबूत होईल, असे ते म्हणाले.
 
ते म्हणाले की आपले अनेक "ओबीसी आणि अदिवासी बंधू याच वर्गातील आहेत. या चार वर्गातील लोकांनी भाजपच्या योजनांवर आणि रोडमॅप वर विश्वास दर्शवला आहे. आज सर्व गरीब, वंचित, शेतकरी, आदिवासी, महिला आणि युवा या विजयला आपला विजय समजत आहेत". २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र म्हणून पाहू इच्छिणारा प्रत्येक नागरिक याला यश मानत आहे. असही ते म्हणाले.
 
त्यांनी विशेषतः देशातील स्त्री शक्तीचे अभिनंदन केले आणि भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी महिला शक्ती अभिमानाने बाहेर पडली आहे, असे ते रॅलीमध्ये म्हणत असत याची आठवण त्यांनी करून दिली. ते म्हणाले की, जेव्हा महिला शक्ती ही कुणाची ढाल बनते तेव्हा तिला कोणीही रोखू शकत नाही. 'अधिनियम'चा उल्लेख करून ते म्हणाले की, आज प्रत्येक भगिनी आणि मुलीसाठी महिलांच्या सन्मानाची आणि सुरक्षेची सर्वात मोठी हमी भाजप असल्याचे स्पष्टपणे वाटते.
 
त्यांनी सांगितले की, महिलांना भाजपने 10 वर्षात पाणी, वीज, गॅस, टॉयलेटसह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार देण्यासाठी भाजप सातत्याने काम करत आहे. या संपूर्ण निवडणुकीत भाजपच्या विजयाची जबाबदारी महिलांनी घेतली असल्याचे ते म्हणाले.
 
ते म्हणाले की, आज जग भारतीय लोकशाहीची परिपक्वता पाहत आहे, जे पूर्ण बहुमतासह स्थिर सरकारला मतदान करत आहेत. ते म्हणाले की, भाजपने सेवा-सुशासनाचे नवे मॉडेल आणले आहे, ज्याच्या केंद्रस्थानी देश आणि देशवासी आहेत, 'भारत माता की जय' हा त्याचा मंत्र आहे.