आरे कॉलनीत अवैध पार्किंग, मद्यपान करणाऱ्यांवर वनविभागाचा चाबूक!

दंडात्मक कारवाई करत ८ जणांवर गुन्हे

    04-Dec-2023
Total Views |





illegal parking at aaray
मुंबई (विशेष प्रतिनिधी): गोरेगाव येथील आरे कॉलनीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वनविभागाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात काही वाहने पार्किंग केलेली होती. आरे वनपरिमंडळामधील राखीव गोरेगाव क्षेत्रामध्ये गस्त घालत वपनकर्मचाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात अपप्रवेश करुन पार्क केलेल्या ६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१)(१ए)अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई केलेल्या आरोपींकडून प्रतीवाहन ५००० रू. दंड वसूल करण्यात आला असून वनक्षेत्रात मद्यपान करणाऱ्यांवर ही वनविभागाने कारवाई केली आहे. मद्यपान करणाऱ्या ८ व्यक्तींवर कायद्याचा चाबुक ओढला असून आठही जणांवर गुन्हा दाखल करत एकुण ३८०००/- रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वन विभागाच्या क्षेत्रात अवैधरित्या प्रवेश करणे, त्या क्षेत्रामध्ये मद्यपान करणे, घाण/कचरा टाकणे, वाहने पार्किंग करणे हे कायद्याने गुन्हा आहे असे कृत्य नागरिकांनी करू नये असे जाहीर आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. तसेच असे कृत्य करताना आढळून आल्यास वनविभागाच्या आरे कार्यालयास संपर्क साधण्यासाठी ही आवाहन करण्यात आले आहे.