जामनगर व भूज या टापूत साधारणपणे सहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर १९७१ मध्ये भारत - पाकिस्तान दरम्यान धुमश्चक्री चालू होती. सोळा डिसेंबर ला युद्ध बंदी { सीज् फायर } घोषित करण्यात आली होती. पण,या ऐन धुमश्चक्रीत मिधनापूरच्या जवळपास अडीचशे महिलांनी इतिहास रचला. महिला नव्हेत... तर अठरा - वीस वर्षांच्या त्या लग्न झालेल्या लेकुरवाळ्या मुलीच होत्या.
१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात तयार करण्यात आलेली ही घटना भूज विमानतळाचे तत्कालीन प्रभारी स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या जीवनाविषयी असून त्यांनी आणि त्यांच्या पथकाने २५० स्थानिक महिलांच्या मदतीने भूजच्या एअरबेसची पुनर्रचना केली.
त्यावेळी 'जामनगर' भारतीय वायुदलाचे ऑपरेशनल स्टेशन होते. तर 'भूज रनवे' हा मधला एक थांबा होता. हानी झालेल्या एखाद्या विमानाला तिथे उतरण्याची सोय निर्माण केलेली होती. 'जामनगर' वरून 'कराची' वर हल्ला करणं सुलभ व सोयीचं होतं. अर्थात् त्याच बेसवरून भारतीय हवाई दलाची विमाने हल्ला करून परतत असत. डिसेंबर च्या या दहा दिवसात 'कराची' चे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं, असं त्या युद्धाचा इतिहास सांगतो.
पाकिस्तानच्या हवाई शक्तीला बेअसर करण्यासाठी पाकिस्तान हवाई तळांवर हल्ला करण्यासाठी वायुदलाची हंटर्स, मिग-२१ आणि कॅनबेरा बॉम्बरचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. ''गो" या शब्दावरून हवाई वर्चस्व प्राप्त करणाऱ्या लढाऊ ताफ्याव्यतिरिक्त, वायुदलाच्या वाहतूक आणि हेलिकॉप्टर ताफ्यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आठ व नऊ डिसेंबर च्या काळात 'भूज रनवे' चे पाकिस्तान च्या बाॅम्बफेकित बऱ्यापैकी नुकसान झाले होते. तेथील कलेक्टरने शेजारील 'मिधनापूर' गावच्या महिलांची मदत घ्यायची ठरवली. 'मिधनापूर' हे काही गरीब गाव नव्हतं. 'मधापर.. मिधनापूर' मधील अनेक रहिवासी परदेशात आफ्रिका, यूके, यूएसए आणि कॅनडामध्ये काम करतात. परंतु ते, त्यांचे पैसे भारतात साठवण्यास प्राधान्य देत, ज्यामुळे बँक ठेवींच्या बाबतीत 'मधापर' हे सर्वात श्रीमंत गाव मानले जाते. दिवस रात्र बाॅम्बफेक चालू असतांनाही येथील महिलांनी रनवे सर्फेंसिंगचं काम जीवाची पर्वा न करता शिवाय काहीही मोबदला न घेता पूर्ण केले. काही महिलांनी तर लेकराला पाठुंगळीस बांधून कामे केली. 'एन्ड माईंड यू नो कॅज्युल्टीज्... नाइट अ सिंगल'...!
धन्य तो भारत देश, धन्य त्या भारतीय माय- माऊली ज्यांनी 'राष्ट्र सर्वप्रथम' हि संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणून राष्ट्रापुढे एक आदर्श प्रस्थापित केला. पुढे यावर 'भूज' सिनेमा निघाला.
मुकुंद पुराणिक
८६०५६८४३००