लोकसभेत ‘तिसरी बार मोदी सरकार’चा गजर

अधिवक्ता सुधारणा विधेयक मंजुर; महुआ मोईत्रा यांचा अहवाल आज सादर होण्याची शक्यता

    04-Dec-2023
Total Views |
Parliament Winter Session

नवी दिल्ली :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप सदस्यांनी ‘तिसरी बार मोदी सरकार’ आणि ‘बार बार मोदी सरकार’ अशा घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत भाजप सदस्यांमध्ये तीन राज्यांमधील विजयामुळे वाढलेला आत्मविश्वास दिसून आला. लोकसभेत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘तिसरी बार मोदी सरकार’ आणि ‘बार बार मोदी सरकार’ अशा घोषणा देऊन त्यांचे सभागृहात स्वागत केले.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अपवाद वगळता दोन्ही सभागृहांमध्ये सुरळीत कामकाज पार पडले. लोकसभेत अधिवक्ता सुधारण विधेयक आवाज मतदानाने मंजुर करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय जनजातीय विद्यापीठ विधेयकदेखील सादर केले. त्याचप्रमाणे राज्यसभेमध्ये पोस्ट कार्यालय विधेयकही मंजुर करण्यात आले. लोकसभेमध्ये फलकबाजी करणारे खासदार दानिश अली यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कठोर शब्दात समज दिली.

अधिवेशनामध्ये आज (मंगळवारी) पैशांच्या बदल्यात लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या आरोपी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांच्या सदस्यत्वाचा फैसला होऊ शकतो. खासदार मोईत्रा यांच्याविषयीचा लोकसभेच्या आचार समितीचा अहवाल सादर होऊ शकतो. हा अहवाल सादर झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांना त्यांची खासदारकी गमवावी लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राज्यसभेमे आप खासदार राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेण्याचाही निर्णय घेतला.