ज्यांनी रामाला नाकारले त्यांचा पराभव झाला; रामजन्मभूमीचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे राउतांना प्रत्युत्तर!

31 Dec 2023 14:47:31
sanjay raut
 
लखनौ : राममंदीराच्या उद्धाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. २२ जानेवारीला रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. एकीकडे भारतभर उत्साहाच वारावरण आसताना दुसरीकडे संजय राऊत सोहळ्याच्या निमंत्रणावरुन रोज सरकारवर टीका करत आहेत. त्यांना रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उत्तर दिले आहे.
 
ज्यांनी भगवान रामांना नाकारल त्यांचा पराभव झाला आहे. अशी प्रतीक्रीया आचार्य सत्येंद्र दास यांनी संजय राउत यांच्या वक्तव्यावर बोलताना केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
 
 
 
"संजय राऊत यांना खूप वेदना होत आहेत, ते वेदना व्यक्त करू शकत नाहीत म्हणून ते प्रभू रामचंद्रांना त्यात ओढत आहेत... भाजपने प्रभू रामांना राजकारणात आणून नव्हे तर श्रद्धा आणि विश्वासावर सत्ता मिळवली आहे. ज्यांनी रामाला नाकारले त्यांचा पराभव झाला आणि ज्यांनी स्वीकारले तो आज सत्तेत आहे..." अस आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटल आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0