महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची मोठी संधी; विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात

30 Dec 2023 15:25:01
Maharashtra Pollution Control Board Recruitment
 
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र नियंत्रण मंडळाद्वारे या भरतीसंदर्भात एकूण ६१ रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नियंत्रण मंडळांतर्गत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीकरिता अर्ज करू शकतात. या भरतीकरिता शैक्षणिक पात्रता, पद, वयोमर्यादा, अंतिम मुदत याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

लिपिक, प्रयोगशाळा सहायक, लेखापालासह विविध पदे.


शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर, पदांच्या आवश्यकतेनुसार.


वयोमर्यादा -

१८ ते ४३ वर्षे


वेतनमान -

३० हजार ते २ लाख रुपये


परीक्षा/अर्ज शुल्क -
 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये.

अर्ज स्वीकृतीस दि. २९ डिसेंबर २०२३ पासून सुरूवात

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १९ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.

जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

Powered By Sangraha 9.0