वर्षाअखेरीस आयकर विभागाकडून विक्रमी ८ कोटी आयटीआर फाइलिंग

30 Dec 2023 17:02:41
 Income-tax Department ITR Filed

मुंबई :
 २०२३ या वर्षाअखेरीस आयकर विभागाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. २०२३-२४ या वार्षिक सत्रामध्ये तब्बल ८ कोटी आयकर रिटर्न जमा करण्यात आला आहे. आयकर विभागाने यासंदर्भात Xवर पोस्ट केली आहे. आयकर विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या अतुल्यनीय कामगिरीपर्यंत आम्ही पहिल्यांदाच पोहोचलो आहोत.


दरम्यान, २०२३-२४ या वर्षात एकूण ७ कोटी ५१ लाख ६० हजार ८१७ आयटीआर फाइलिंग करण्यात आले आहे. आम्ही पहिल्यांदाच ८ कोटींचा पल्ला गाठला असून हा पल्ला गाठण्यात मदत केल्याबद्दल सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार, असेही आयकर विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0