भाजपने केला केसीआर यांचा पराभव; काँग्रेसच्या या बड्या नेत्यालाही हरवले

03 Dec 2023 19:25:12

kcr
 
हैद्राबाद: तेलंगणाच्या कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या के. व्यंकटरमन रेड्डी (६६,६५२ मते) यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (५९,९११ मते) यांचा ६७४१ मतांनी पराभव केला आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचा संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले ए. रेवंथ रेड्डी (५४९१६) सुद्धा निवडणूक लढवत होते. त्यांचा ही यात पराभव झाला आहे.
 
 बीआरएसचे केसीआर व काँग्रेसचे रेवंथ रेड्डी दोघांनीही प्रत्येकी २ मतदारसंघातुन निवडणूक लढवली होती. रेवंथ यांनी कोडांगल विधानसभा मतदारसंघात ३२,५३२ मतांनी विजय मिळवला आहे. तर केसीआर गजवेल विधानसभा मतदारसंघात ४२,३५२ मतांनी आघाडीवर आहेत. येथे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
 
तेलंगाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगणाच्या स्थापनेपासूनच मुख्यमंत्री असलेल्या बीआरएस पक्षाच्या के चंद्रशेखर राव यांचा काँग्रेस ने दारुण पराभव केला आहे. आत्तापर्यंत च्या अकड्यानुसार २०१८ च्या निवडणूकीत ८८ जागा मिळवून सत्तेवर असणाऱ्या केसीआर यांना यावेळी ३९ जागांवर समाधान मानावे लागत आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार ए. रेवंथ रेड्डी यांना मानण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0