नृत्यदर्पण अकॅडमीचा शास्त्रीय नृत्य महोत्सव उल्हासात साजरा

03 Dec 2023 16:09:55
Nrityadarpan Academy of Fine Arts

मुंबई :
नृत्यदर्पण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स आयोजित शास्त्रीय नृत्य उत्सव ‘स्फूर्ती‘ नवोदित कलाकारांसाठी एक हक्काचा रंगमंच म्हणून ओळखला जातो. दि. २ डिसेम्बर रोजी दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह येथे संध्याकाळी ६ वाजता संपन्न झाला. या उत्सवादरम्यान एकाच रंगमंचावर विविध शास्त्रीय नृत्यांचं सादरीकरण आणि गीतरामायण ही नृत्य नाटिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कवितेवर आधारित नृत्य सादरीकरण कलाकारांनी केले. यावेळी नृत्यदर्पण च्या संस्थापिका संध्या दामले यांच्या हस्ते मान्यवरांचे सन्मान झाले. या प्रसंगी नगरसेविका मृणाल पेंडसे, व्हॉइस गुरु प्रदीप वेलणकर, नृत्य कलाकार मयुरेश वाडकर, वीर सावरकर फाउंडेशन, पुणे येथील अध्यक्ष प्रीतम थोरवे यावेळी उपस्थित होते. या नृत्यमहोत्सवाचे सह-प्रायोजक मृदगंध, लॉयल इलेक्ट्रिकल्स, जाई काजळ, निरगुडकर आणि अंग्रेझी होते. 

गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारत नाट्यम नृत्यप्रकारातील अनेक नृत्ये यावेळी सादर झाली. श्रीदेवी आवाहन, गणेशकौतुक, विठ्ठल आवाहन, लीला निधी तसेच अनेक रागातील सुद्धा नृत्ये झाली. भरत नाट्यम सोबतच कथक नृत्यप्रकारची काही सादरीकरणे झाली. लहेजा आर्ट फाउंडेशन च्या नृत्यगनानी कथक प्रकरतील 2 नृत्ये सादर केली. कृष्ण रूपाची वर्णने करणारी ही नृत्ये होती, तसेच दुसऱ्या नृत्यात त्याच्या लिलांची वर्णने सादर झाली.

Nrityadarpan Academy of Fine Arts

यावेळी विविध कला शाळा आणि नृत्य शाळांच्या गुरूंचे सत्कार व सन्मान करण्यात आहे. यात नृत्यदार्पण ची बांगलूरू येथील शाखा पाहणाऱ्या गायत्री, कथक गुरु मेधा खरे, अंडल फाईन आर्टस् गुरु माधुरी प्रताप, नटरंग च्या गुरु माही जोष्टे, अथर्व स्कुल फाईन आर्टस् च्या गुरु शामल, लहेजा फाउंडेशन च्या गुरु शीतल खांडेकर, नृत्यगण च्या गुरु दिव्या दवे, वीर सावरकर फाउंडेशन, पुणे येथील अध्यक्ष प्रीतम थोरवे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. यांचा समावेश होता. तसेच सर्व गुरूंसोबत त्यांच्या शिष्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0