मध्य प्रदेशमध्ये भाजपचे 'मामा'राज; काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवारच पिछाडीवर!

03 Dec 2023 11:50:51

shivraj
 
भोपाळ : मध्य प्रदेशच्या निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या आकडेवारीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. २३० जागांच्या विधानसभेत भाजपने १५६ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसला अवघ्या ७० जागांवर आघाडी मिळवता आली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या कमलनाथ छिंदवाडा विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर इंदौरमधून काँग्रेसचे दिग्गज नेते जीतू पटवारी सुद्धा पिछाडीवर आहेत.
 
काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेश अटीतटीच्या लढतीचे अंदाज बांधण्यात आले होते. पण निवडणूकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे की, मध्य प्रदेशमध्ये भाजप एकहाती सत्ता मिळवत आहे. हा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का आहे.
 
मध्यप्रदेश मध्ये मागच्या दोन दशकांपासून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजप चे सरकार आहे. २०१८ च्या निवडणुकीत भाजपपेक्षा १% मतदान कमी असूनही काँग्रेस ने २३० पैकी ११४ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला १०९ जागांवर विजय मिळवला आला होता. पण ज्योतिरादित्य सिंधीय यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस दिड वर्षातच आपली सत्ता गमवावी लागली होती. यावेळी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी काँग्रेसच्या प्रचाराची सूत्र आपल्या हाती ठेवली होती. परंतु सुरुवातीच्या आकडेवारीनुसार काँग्रेसचा दारुन प्रभाव होताना दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0