मुंबई : भाजप नेते गिरीश महजन यांनी मनोज जारांगे पाटलांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. शुक्रवारी २९ डिसेंबर ला माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी आंतरवाली सराटी येथून पुणे मार्गे मुंबईला मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की "मराठा समाजाला टीकणारं आणि कायमस्वरुपी आरक्षण द्यायचे आहे. जरांगे पाटलांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, मराठा आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येणार नाही".
मराठा आंदोलकांचा मोर्चा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी होणार असल्याने मुंबईतील मैदाने सरकारने उपलब्ध करून द्यावीत असही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. साधारण ३ कोटी मराठा बांधव मोर्चात सहभागी होतील असा अंदाज मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.