लखनौ : अयोध्येतील रेल्वे स्थानकानंतर आता यात्रेकरुंच्या सुविधेसाठी बनवण्यात आलेल्या विमानतळाचेही नामकरण करण्यात आले आहे. अयोध्येतील विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे नाव देण्यात आले आहे.
अयोध्येमध्ये श्रीराममंदीराच्या उद्धाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व भाविकांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी घरुनच आनंद साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर २४ जानेवारीला मंदीर सर्वांसाठी खुले होणार आहे. त्यानंतर अयोध्येमध्ये भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात होईल. भाविकांच्या सोय़ीसाठी आधुनिक रेल्वे स्थानक व विमानतळ निर्माण करण्यात आले आहे.
नुकतेच नविन अयोध्या स्थानकाचे नाव बदलून अयोध्याधाम असे करण्यात आले होते. या स्थानकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३० डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. आणि आता विमानतळाला ही महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे नाव देण्यात आले आहे.