अभिनेते अनुपम खेर यांनी भेट घेत राजनाथ सिंह यांचे मानले आभार

29 Dec 2023 12:00:30

anupam kher 
 
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. अनुपम यांनी राजनाथ यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली असून यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली अशी माहिती फोटो पोस्ट करत दिली.
 
अनुपम खेर यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, "देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या संरक्षण दलांव्यतिरिक्त विविध विषयांचे त्यांचे अफाट आणि सखोल ज्ञान वाखाणण्यासारखे आहे. तुमच्याकडून मला खुप काही शिकायला मिळाले. तुमच्या प्रेमळ आणि आदरातिथ्याबद्दल धन्यवाद सर. जय हिंद."
 
 
 
अनुपम खेर यांचे आगामी अनेक चित्रपट भेटीला येणार आहेत. नुकतीच त्यांचा 'द फ्रीलांसर - द कन्क्लुजन' ही वेब मालिका डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. याशिवाय लवकरच कंगना राणौत दिग्दर्शित 'इमर्जन्सी' या चित्रपटात ते जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0