१.श्रीराम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिर शिल्पकलेचा देदीप्यमान वारसा म्हणजे श्रीराम मंदिर!
२. मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.
३. मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २० फूट आहे. मंदिरात एकूण ३९२ खांब, ४४ द्वार आहेत.
४. तळमजल्यावरील गर्भगृहात (गाभारा) भगवान श्रीरामाच्या बालस्वरुप विग्रह विराजमान होणार असून पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार असेल.
५. नृत्य मंडप, रंगमंडप, गूढ मंडप (सभा मंडप), प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत.
६. खांब आणि भिंतींमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.
७. पूर्वेकडून ३२ पायर्या (उंची १६.५ फूट) चढून सिंहद्वारमधून मंदिरात प्रवेश मिळेल (अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सोय करण्यात आली आहे).
८. सभोवताली गोल भिंत (आकाराची) - लांबी ७३२ मीटर, रुंदी ४.२५ मीटर आहे.
९. उद्यानाच्या चार कोपर्यात सूर्य, शंकर, गणपती, देवी भगवती अशी चार मंदिरे. उद्यानाच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेला अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे.
१०. मंदिराच्या दक्षिणेकडे पौराणिक सीताकूप आहे. उद्यानाच्या बाहेर दक्षिण दिशेला महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे प्रस्तावित मंदिर आहे.