'लडाख'च्या विकासाला आणखी गती मिळणार; तब्बल ११०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी

29 Dec 2023 17:31:03
Ladakh Allocation has been Sanction For road Projects

नवी दिल्ली :
राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्रीय रस्तेमार्ग आणि पायाभूत सुविधा निधी(सीआरआयएफ) अंतर्गत लडाखमधील विकासास गती मिळण्याची शक्यता आहे. लडाखमधील राज्य महामार्ग, प्रमुख आणि इतर जिल्हा रस्तेमार्गांचा समावेश असलेल्या २९ रस्ते प्रकल्पांसाठी ११७०.१६ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.


दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, चालू आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि 'सीआरआयएफ'अंतर्गत ८ पुलांसाठी एकूण १८१.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच, प्रस्तावित प्रकल्पांमुळे येथील दुर्गम गावांशी संपर्क सुधारून आर्थिक गतीविधींना, विशेषतः कृषी आणि पर्यटनाला चालना, पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लागेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0