लखनौ : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी माध्यमांना राममंदीराबाबत माहीती दिली आहे. तीर्थक्षेत्रावरील सुविधा कशा असतील याबद्दल त्यांनी नकाशाद्वारे माहीती दिली. त्यांनी सांगितले की एकुण ७० एकर जागेपैकी ३० टक्के जागेवरच बांधकाम होणार आहे बाकी सर्व जागा मोकळी आहे. हिरवळ, गवत आणि शेकडो वर्ष जुनी झाडे आहेत.
तिर्थक्षेत्रावर काय आहेत सुविधा
- भुजल पातळी खाली जाणार नाही याची खात्री घेण्यात आली आहे.
- नाल्यातील पाणी शरयु नदीत जाणार नाही याचीही काळजी घेतली गेली आहे.
- तिर्थक्षेत्रावर साधारण २५०० यात्रेकरुंसाठी लॉकर सुविधा उपलब्ध असणार आहे. शूज, चप्पल, मोबाइल, पर्स, लहान बॅग. यासाठी ‘तीर्थक्षेत्र सुविधा केंद्रही (PFC)’ तयार करण्यात आले आहे.
- एक छोटे रुग्णालयही येथे उभारण्यात आले आहे.
- वॉशरूमसाठी मोठे कॉम्प्लेक्सही तयार करण्यात आले आहे. हे संकुल केवळ यात्रेकरूंसाठी असेल, ते ट्रस्टचे असेल. त्याचा कचरा महापालिकेच्या गटारात जाणार नाही. येथे २ सीवर ट्रीटमेंट प्लांट बांधले जात आहेत.
- उन्हाळ्यात अनवाणी चालताना पाय जळणार नाहीत याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरम्यान, २२ जानेवारीला रामललांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. २२ जानेवारीला जरी सोहळा असला तरी आतापासूनच येथे अनेक विधी व यज्ञ सुरु आहेत. रामजन्मभूमी संकुलात चारही वेदांचे पारायण व यज्ञ अखंडपणे सुरू आहेत. तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे देशभरातुन अनेक विद्वानांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. हे यज्ञ व विधी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत अवितर सुरु राहणार आहे.