लखनौ : अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज यांनी बाळासाहेबांचा आत्मा आज रडत असेल. त्यांचा स्वतःचा मुलगा सोनिया चरणी लीन झाला अस वक्तव्य केल आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. राममंदीराच्या उभारणीत महाराष्ट्राच्या लोकांच मोठ योगदान आहे. असही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंना रामंदीराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रणाच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की "आपण सर्वे भवन्तु सुखिनः मानणारे लोक आहोत कोणाचाही अपमान आपण करत नाही. परंतु सनातनला विरोध करणाऱ्यांना आपण उत्तर दिले पाहीजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की विद्रोहींबरोबर सरकार स्थापन करावे लागले तर अशा राजकारणाला मी तिलांजली देईन. पण त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेंनी रामाचे अस्तीत्व न मानणाऱ्या, राममंदीराला विरोध करणाऱ्या सोनिया गांधींसमोर लोटांगण घातले".
पुढे ते म्हणाले की, "रामचंद्रांना इतके वर्ष तंबुत ठेवणाऱ्या लोकांसोबत सरकार बनवल्यामुळेच त्यांचे सरकार टीकले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. कोणाला आमंत्रण द्यावे हे ट्रस्ट ठरवेल पण मी त्यांना विनंती करेल की शेकडो रामभक्त अयोध्येला येण्यासाठी आतुर आहेत. रामद्रोह्यांना इथे बोलवण्याची आवश्यकता नाही"